
कळव्यातील खारेगाव उड्डण पूलावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदार निधीतून केलेल्या कामाजवळ एक एलईडी बोर्ड लावला होता. तो बोर्ड महापालिकेने कारवाई करत काढून टाकला. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
किती हे सुडाचे राजकारण… कळव्याच्या पूर्वेला मी जी आमदार निधीतून कामे केली आहेत त्या कामांचा उल्लेख असलेला LED Board आमदार निधी तून लावण्यात आला होता. आज सकाळी अचानक 8 वाजता महापालिकेचे अधिकारी मनिष जोशी यांच्या नेतृत्वाखाली त्या बोर्डची मोडतोड करून तो बोर्ड काढण्यात आला. pic.twitter.com/Ibq00BUYEq
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 13, 2023
किती हे सुडाचे राजकारण…कळव्याच्या पूर्वेली मी जी आमदार निधीतून कामे केली आहेत. त्या कामाचा उल्लेख असलेला LED बोर्ड आमदार निधीतून लावण्यात आला होता. आज सकाळी अचानक 8 वाजता महापालिकेचे अधिकारी मनिष जोशी यांच्या नेतृत्वाखाली त्या बोर्डची मोडतोड करून तो काढण्यात आला.” असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं होतं.



























































