
ठाण्याच्या खाडी लगतच्या भागात दररोज हजारो टन कचरा टाकला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली असून जर हा प्रकार थांबला नाही तर महापालिकेच्या गाड्या आम्ही पेटवून देऊ, असा इशारा त्यांनी ठाणे महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
ठाण्याच्या खाडी लगतच्या भागात गेले काही दिवस रोज,हजारो टन कचऱ्याच डंपिंग होत आहे.शेकडो ट्रक येथे रिकामे करण्यात येत आहेत.
ही या शहरासाठी मोठी धोक्याची घंटा आहे.या डंपिंगमुळे त्या भागात असणारे मॅनहोल तुंबून गेलेत,खाडी लगतची जलसंपदा नष्ट होत आहे.
ठाणे मनपाचे अधिकारी या बाबत देखील… pic.twitter.com/UD22vXXiEL— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 2, 2023
”ठाणे खाडी लगतच्या भागात गेले काही दिवस रोज, हजारो टन कचऱ्याचं डंपिंग होत आहे. शेकडो ट्रक येथे रिकामे करण्यात येत आहेत. ही या शहरासाठी मोठी धोक्याची घंटा आहे. या डंपिंगमुळे त्या भागात असणारे मॅनहोल तुंबून गेलेत, खाडी लगतची जलसंपदा नष्ट होत आहे. ठाणे मनपाचे अधिकारी या बाबत देखील प्रचंड उदासीन आहेत. राज्य सरकारचे बटिक होऊन ही लोक काम करत आहेत. तरी ठाणे मनपाच्या अधिकाऱ्यांना माझं सांगणे आहे की हे अनधिकृत डंपिंग थांबवा, या गाड्या थांबवा, नाही तर आम्ही त्या पेटवून देऊ..!” असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.


























































