कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1चे देशभरात 21 रुग्ण, महाराष्ट्रासह अन्य दोन राज्यात आढळले रुग्ण

देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. आतापर्यंत कोविड-19 च्या ओमायक्रॉनच्या JN.1 व्हेरिएंटची 21 प्रकरणे देशरभरात नोंदवली गेली आहेत. गोवा, केरळ आणि महाराष्ट्रात नवीन कोरोनाव्हायरस प्रकाराची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

गोव्यात आतापर्यंत कोविडचा नवा व्हेरिएंट JN.1 ची 19 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर केरळ आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक आढळला आहे.

ओमायक्रॉन व्हेरिएंटचाच एक नवा प्रकार JN.1 हा गेल्या काही आठवड्यांमध्ये सर्वात वेगानं पसरणाऱ्या विषाणूंपैकी एक बनला आहे.