
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एक मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. हा मृतदेह सापडल्याची बातमी पसरल्यानंतर विद्यापीठात खळबळ उडाली आहे.
संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास काही विद्यार्थ्यांनी पोलिसांना फोन करून मृतदेह आढळून आल्याचे कळवले. त्यानंतर तत्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले. अद्याप तो मृतदेह कुणाचा आहे ते समजलेले नाही. मात्र या प्रकरणामुळे जेएनयूमध्ये वातावरण बिघडण्याची शक्यता असल्याने मोठ्य प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आल्याचे समजते.





























































