
जोगेश्वरी परिसरात रेमडेसेवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱया एकाला क्राईम ब्रँचच्या युनिट 10ने ताब्यात घेतले. त्याच्याकडून 12 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केली.
शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या औषधाचा काळाबाजार होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली आहे. जोगेश्वरी परिसरात एक जण रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार जोगेश्वरी येथे कारवाई करून पोलिसांनी एकाला ताब्यात घेत त्याच्याकडून 12 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केली आहेत.



























































