नागरी निवारा क्रीडांगणाचा कायापालट! जॉगिंग ट्रक, ओपन जीम, मुलांसाठी खेळणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जॉगिंग ट्रक, ओपन जीम, मुलांसाठी खेळणी, तरुणांसाठी मैदान, ज्येष्ठांसाठी आरामदायी बैठक व्यवस्था अशा सुविधा नागरी निवारा वसाहतीमधील क्रीडांगणामध्ये करण्यात आल्या आहेत. शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सुनील प्रभू यांच्या आमदार निधीमधून आणि स्थानिक नगरसेवक तुळशीराम शिंदे यांच्या सहकार्याने करण्यात आलेल्या या क्रीडांगणाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले.

प्रभाग क्र. 41 मधील नागरी निवारा वसाहतीमधील कृष्णा, कावेरी, इंद्रायणी सोसायटीमधील रहिवाशांना या क्रीडांगणाचा मोठा फायदा होणार आहे. या उद्यानाला स्वर्गीय कमलताई देसाई यांचे नाव देण्यात आले आहे. या उद्यानाच्या लोकार्पणप्रसंगी उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, नगरसेवक आत्माराम चाचे, उपविभागप्रमुख काशीनाथ परब, विधानसभा समन्वयक आशा केणी, उपविभाग समन्वयक प्रशांत घोलप, उपविभाग संघटक विद्या गावडे, उपविभाग समन्वयक विनिता विचारे, शाखाप्रमुख संपत मोरे, संदीप जाधव, महिला शाखा संघटक पद्मा राऊळ, सुनंदा सपकाळ यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी, रहिवासी उपस्थित होते.