अग्निशमन दलात संयुक्त जयंती महोत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई अग्निशमन दल संयुक्त जयंती महोत्सव समितीतर्फे नुकताच सर्व महापुरुषांचा जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांनी महापुरुषांच्या त्यागाचे, संघर्षाचे आणि देशासाठी केलेल्या योगदानाचे विचार आपल्या व्याख्यानातून मांडले. त्यानंतर त्यांचा सत्कार दलाचे उपप्रमुख अग्निशमन अधिकारी एच. व्ही. गिरकर यांच्या हस्ते करण्यात आला.

माजी आमदार बाळासाहेब दांगट, गणेश चौधरी, युनियन लीडर रमाकांत बने, प्रशांत तळेकर, संजय बापेरकर, देवीदास लोखंडे यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्र अधिकारी के. व्ही. शिर्पे होते. यावेळी व्ही. एन. सांगळे, आर. धांडे, धर्मेंद्र डबडेदेखील उपस्थित होते.