
महाराष्ट्रात गुंडाराज सुरू असल्याचा प्रत्यय वारंवार येताना दिसत आहे. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. पुण्यात आयोजित निर्भय बनो सभेसाठी जात असताना वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.
शुक्रवारी पुण्यातील दांडेकर पुलावरील राष्ट्र सेवा दल येथील हॉलमध्ये निर्भय बनो सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेसाठी निखिल वागळे, अॅड. असीम सरोदे, समाजवादी नेते नितीन वैद्य इत्यादी उपस्थित आहेत. या सभेसाठी निखिल वागळे यांची गाडी पोलीस बंदोबस्तात जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यातच त्यांच्यावर हल्ला केला.
यापूर्वी ही सभा झाली तर कायदा सुव्यवस्था बिघडेल त्यामुळे ही सभा होऊ देणार नाही, असा इशारा भाजपने दिला होता. गाडीवर हल्ला होऊनही वागळे हे कार्यक्रमस्थळी दाखल झाले. त्यांचं तिथे स्वागत करण्यात आलं.


























































