ज्युनियर कॉलेज शिक्षकांचा उद्या मूक मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
teacher-1
प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्य सरकारने ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकांना दिलेली आश्वासने न पाळल्यामुळे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने विविध टप्प्यांत आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात 30 जानेवारी रोजी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांकर ‘मूक मोर्चे’ काढण्यात येणार आहेत.

मुंबई विभागात वाशी येथील विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयावर दुपारी 1 वाजता मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा वाशी रेल्वे स्थानकातून निघणार आहे. 30 जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून सरकारच्या शिक्षणविरोधी धोरणाच्या निषेधार्थ व प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी काळ्या फिती लावून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनानंतरही सरकारने दखल न घेतल्यास बारावीच्या बोर्डांच्या परीक्षाकाळात ‘असहकार आंदोलन’ करण्यात येणार आहे, असे  प्रा. अनिल देशमुख यांनी सांगितले.

1 फेब्रुवारीपासून बारावीची तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा

1 ते 18 फेब्रुवारीपासून बारावीची तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे. या परीक्षांचे साहित्य वाटप 30 जानेवारी रोजी वाशी येथील विभागीय शिक्षण मंडळ कार्यालयातून होणार आहे. बारावीच्या तोंडी परीक्षांचे यंदा शेवटचे वर्ष असून पुढील वर्षापासून तोंडी परीक्षा होणार नाहीत.