
सरकारी धोरणांचा विरोध करणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी वाराणसीतील एका कनिष्ठ अभियंत्याला (ज्यूनिअर इंजिनिअर) निलंबित करण्यात आले आहे. वाराणीसीत कार्यरत असलेल्या प्रवीण कुमार यांनी आपल्या फेसबुक वॉलवरील पोस्टमध्ये पंतप्रधानाविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली होती. तसेच अयोग्य शब्दांत सरकारी धोरणांचा विरोध केला होता, अशी माहिती सरकारी प्रवक्तांनी दिली आहे. तसेच त्यांनी राजकीय पक्षांसोबतचे फोटोही शेअर केले होते. तसेच प्रवीण कुमार 26 ऑगस्टपासून कोणत्याही सूचनेशिवाय अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सरकारी प्रवक्त्यांनी सांगितले.
























































