
ज्युनियर हॉकी वर्ल्ड कपचा थरार मंगळवारपासून क्वालालंपूरमध्ये रंगणार आहे. दोनदा अजिंक्य ठरलेला हिंदुस्थानी संघ दक्षिण कोरियाविरुद्धच्या लढतीने स्पर्धेतील मोहिमेचा श्रीगणेशा करणार आहे. त्यामुळे यावेळी त्यांच्या कामगिरीकडे देशवासीयांच्या नजरा असतील.
दोन वर्षांपूर्वी मायदेशात झालेल्या ज्युनियर हॉकी वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. यावेळी ‘क’ गटात हिंदुस्थानसह कोरिया, पॅनडा व स्पेन या संघांचा समावेश आहे. हिंदुस्थानी संघ कोरियानंतर गुरुवारी स्पेन, तर शनिवारी पॅनडाशी भिडेल. ‘अ’ गटात गतविजेता अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, चिली व मलेशिया, तर ‘ब’ गटात मिस्त्र्ा, फ्रान्स, जर्मनी व दक्षिण आफ्रिका, तर ‘ड’ गटात बेल्जियम, नेदरलॅण्ड्स, न्यूझीलंड व पाकिस्तान या संघांचा समावेश आहे. उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम सामने अनुक्रमे 12, 14 व 16 डिसेंबरला होणार आहेत.




























































