‘सीएसएटी’वरील नियुक्तीला न्या. सिक्री यांचा होकार मागे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

लंडन येथील ‘कॉमनवेल्थ सेक्रेटरियट आर्बिट्रल ट्रायब्यूनल’(सीएसएटी)वर अध्यक्ष/ सदस्यपदी काम करण्यास डिसेंबरमध्ये मोदी सरकारला दिलेला होकार सर्वोच्च न्यायालयाचे  न्यायमूर्ती ए. के. सिक्री यांनी आज मागे घेतला.

सिक्री हे सरन्यायाधीश रंजन  गोगोई यांच्यानंतरचे सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. सीबीआयप्रमुख आलोक वर्मा यांच्या हकालपट्टीच्या निर्णयात पंतप्रधानांच्या अधिपत्याखालील तीन सदस्यांच्या समितीच्या बैठकीत त्यांचे मत निर्णायक ठरले होते. त्या बैठकीला सिक्री हे सरन्यायाधीशांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले होते.आलोक वर्मा यांच्या हकालपट्टीचे प्रकरण सध्या गाजत आहे. त्या पार्श्वभूमीवर सिक्री यांनी अनावश्यक वादात अडकू नये म्हणून ‘सीएसएटी’वरील नियुक्तीला दिलेला होकार मागे घेतला आहे.