कबड्डीपटू जयश्री राणे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिका व नवयुग महिला संघाच्या कबड्डी खेळाडू जयश्री राणे-पवार यांचे बुधवारी रात्री कोरोनाने मुंबईत निधन झाले. निधनासमयी त्या 65 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. सध्या जयश्री पुण्यात वास्तव्यास होत्या. तेथे त्यांना कोरोना संसर्ग झाला. पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईत आणण्यात आले, पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. जयश्री या उत्कृष्ट उजवा मध्यरक्षक होत्या. नवयुग संघातूनच नव्हे तर मुंबई महानगरपालिकेच्या संघातून खेळताना मध्यरक्षक म्हणून कबड्डी वर्तुळात दबदबा निर्माण केला होता. भल्याभल्या खेळाडूंना त्यांच्या बचावातून गुण घेणे कठीण जात असे. महापालिकेच्या आंतरविभागीय स्पर्धेत जयश्री यांनी आपला एक वेगळाच ठसा उमटवला होता.