लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान कैलाश खेर यांच्यावर हल्ला, कर्नाटकातील हंपी महोत्सवातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गायक कैलाश खेर यांच्यावर एका लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान हल्ला झाल्याची घटना समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन लोकांनी त्याच्यावर पाण्याची बाटली फेकली. कॉन्सर्ट सुरु असताना प्रेक्षकांकडून कैलाश खेर यांच्याकडे त्यांच्या आवडीचे गाणे गाण्याची मागणी केली जात होती. यावेळी रागाच्या भरात दोन जणांनी खेर यांच्यावर पाण्याची बाटली फेकून मारल्याचे सांगितले जात आहे. यावेळी कैलाश खेर यांच्यासोबत अर्जुन जनन्या, अरमान मलिक, रघु दीक्षित, विजय प्रकाश यांसारखे कलाकारही येथे उपस्थित होते. ही घटना कर्नाटकातील हंपी उत्सवादरम्यान झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान कैलाश खेर यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कर्नाटकात 27 जानेवारीपासून हंपी महोत्सवाला सुरुवात झाली आहे. कैलाश खेर प्रमाणे इतर अनेक सेलिब्रिटी येथे परफॉर्म करण्यासाठी आले होते. दरम्यान कैलाश खेर यांच्याकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.