कालनिर्णयची पाकनिर्णय स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘कालनिर्णय’ने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘पाकनिर्णय 2024’ ही पाककृती स्पर्धा आयोजित केली आहे. मांसाहारी कबाब, चटपटीत चाट, वाफवलेले पदार्थ आणि गूळ, साखर व मध न घालता केलेला गोड पदार्थ या चार विभागांत ही स्पर्धा होईल. स्पर्धकांनी आपली पाककृती आणि पाककृतीचा स्पष्ट फोटो [email protected] या इ-मेलवर किंवा पाकनिर्णय 2024, सुमंगल प्रेस प्रा. लि, 172, एम. एम. जी. एस. मार्ग, दादर (पू), मुंबई-14. या पत्त्यावर पाठवावी. तुम्ही तुमची पाककृती www.kalnirnay.com/paknirnay या लिंकवर अपलोड करू शकता.

पाककृती पाठवण्याची अंतिम तारीख 15 मे आहे. सर्वोत्कृष्ट 12 पाककृती ‘कालनिर्णय 2024’मध्ये तर उत्तेजनार्थ 18 पाककृती ‘कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक 2023’मध्ये आणि काही खास पाककृती ‘कालनिर्णय स्वादिष्ट 2024’मध्ये प्रसिद्ध होतील. अधिक माहितीसाठी www.kalnirnay.com/paknirnay या संकेतस्थळाला भेट द्यावी.