आधारवाडी कारागृहात गॅस गळती; दोन कैदी होरपळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याण येथील आधारवाडी कारागृहात मंगळवारी सकाळी स्वयंपाकघरात गॅस गळती झाल्याने सिलिंडरने पेट घेतला. या दुर्घटनेत पोळ्या बनवत असलेले आसिफ सेंदू आणि अफजल काझी हे शिक्षा भोगत असलेले दोन कैदी भाजले. घटनेनंतर कारागृहातील कर्मचारी व इतर पैद्यांनी अग्निशमन यंत्राच्या सहाय्याने आग तातडीने आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. आधारवाडी जेलमधील स्वयंपाकघरात दुपारचे जेवण बनवण्याची लगबग सुरू होती. त्याचवेळी गॅस गळती झाल्याने सिलिंडरने पेट घेतला. या घटनेत दोन कैदी गंभीर जखमी झाले. या पैद्यांच्या हातापायांना भाजल्याने त्यांना प्रथम उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलवले. या घटनेचा अधिक तपास खडकपाडा पोलीस करत आहेत.