कमल हसन कोरोना पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मक्कल निधी मईयम’ पक्षाचा अध्यक्ष व अभिनेता कमल हसन हा सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. आपल्याला कोरोनाची लागण झाली असून उपचारासाठी आपण रुग्णालयात दाखल झालो आहोत, असे त्याने ट्विटरवर ट्विट केले आहे.

‘अमेरिकेतून परतल्यानंतर मला कफाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे मी कोरोना चाचणी करून घेतली. ती पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे इतरांना संसर्ग टाळण्यासाठी मी स्वतःच रुग्णालयात दाखल झालो. कोविडचा प्रसार कमी झालेला नाही हे लक्षात घेऊन प्रत्येकाने सावध राहिले पाहिजे.’ असे कमल हसनने ट्विटमध्ये म्हटले आहे.