
राष्ट्रपती निवडणूकीआधी कर्नाटकातल्या भाजप आमदारांना शनिवारी संध्याकाळी बंगळुरू येथील हॉटेलमध्ये हलविण्यात आले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते. एम. सतीश रेड्डी यांनी याबाबत महिती दिली असून मतदानासाठी रवाना होईपर्यंत त्या सर्व आमदारांना हॉटेलमध्येच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हिंदुस्थान या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, भाजप द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीबाबत अधिक सतर्कता बाळगत आहे. भाजपने कर्नाटकातील त्यांच्या आमदारांना शनिवार संध्याकाळपासून एका हॉटेलमध्ये ठेवले आहे. या सर्व आमदारांना मतदान प्रक्रीयेचे ट्रेनिंग देखील देण्यात येणार असल्याचे समजते.
सोमवारी होणार मतदान
15 व्या राष्ट्रपती साठी सोमवारी म्हणजेच 18 जुलै रोजी मतदान होणार आहे. देशभरातील तब्बल 4800 खासदार व आमदार या निवडणूकीत मतदान करणार आहेत. संयुक्त विरोधी पक्षाकडून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा (84) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर एनडीएकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
25 जुलैला होणार शपथविधी
18 जुलैला राष्ट्रपती पदासाठी मतदान झाल्यानंतर 21 जुलैला मतगणना होणार आहे. त्या मतगणनेच्या आधारावर विजयी झालेला उमेदवारी 25 जुलै रोजी राष्ट्रपती पदाची शपथ घेईल.



























































