परिसरात विकास का झाला नाही? प्रचारादरम्यान भाजप नेत्याला नागरिकांनी घेरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते व्ही. सोमन्ना यांना मंगळवारी प्रचारादरम्यान नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. सोमन्ना म्हैसूर जिह्यातील वरुणा मतदारसंघात प्रचार करत असताना काही नागरिकांनी त्यांना अडवले आणि परिसरात विकास का झाला नाही, असा सवाल विचारला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावरून कर्नाटकात भाजपने विकासाच्या नावाखाली जनतेच्या तोंडाला पाने पुसली असल्याचे यावरून दिसून येत आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते सिद्धरामय्या यांच्याविरोधात व्ही. सोमन्ना कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.