
बंगळुरूच्या लोकप्रिय रेस्टॉरेण्ट रामेश्वरम कॅफेत शुक्रवारी स्फोट होऊन चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सिलेंडरच्या स्फोटाने ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आगीत चार जण होरपळले होते, त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.
#WATCH | Karnataka | An explosion occurred at The Rameshwaram Cafe in Whitefield, Bengaluru. Injuries reported. Details awaited.
Whitefield Fire Station says, “We received a call that a cylinder blast occurred in the Rameshawaram cafe. We reached the spot and we are analysing… pic.twitter.com/uMLnMFoHIm
— ANI (@ANI) March 1, 2024
कुंदनहल्ली परिसरात असलेल्या रामेश्वरम कॅफेला स्फोटामुळे आग लागली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान तेथे घटनास्थळी पोहोचले आहेत. हे कॅफे बेंगळुरूमधील सर्वात लोकप्रिय फूड जॉइंट्सपैकी एक आहे. रेस्टॉरंटमध्ये 3 लोक काम करत होते. जेवणासाठी आलेल्या महिलेसह चार जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
























































