
भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एका सरकारी कार्यक्रमातील हा व्हिडीओ असून तक्रार करायला आलेल्या एका महिलेला या मंत्र्यांनी सर्वांसमक्ष कानाखाली मारली. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरायला सुरुवात केली आहे. भाजप नेत्यांना सत्तेची मस्ती आल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
शनिवारी कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यातील हांगला गावात कर्नाटकचे पायाभूत सुविधा विकास मंत्री व्ही. सोमण्णा हे एका शासकीय कार्यक्रमासाठी आले होते. सरकारकडून ग्रामस्थांना जमीन हक्कपत्र प्रदान करण्याचा हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात हक्कपत्र वाटप सुरू असताना अचानक एक महिला आपल्याला हक्कपत्र न मिळाल्याची तक्रार घेऊन समोर आली. या महिलेच्या वर्तनामुळे संतप्त झालेल्या मंत्रीमहोदयांनी थेट तिच्या कानाखाली मारली.
एकीकडे कार्यक्रम सुरू असताना दुसरीकडे ही महिला अधिकाऱ्यांकडे तक्रार करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. अधिकाऱ्यांनी न जुमानल्यामुळे ही महिला थेट मंत्रीमहोदयांकडे तक्रार करु लागली. मात्र, यामुळे संतप्त झालेल्या मंत्र्यांनी थेट महिलेच्या कानाखाली मारल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. सर्वांसमक्ष घडलेल्या प्रकारानंतरही महिलेने मंत्र्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला.
Karnataka BJP government minister V Somanna slapped a woman who came with a complaint.
This is the real disgusting face of the BJP which has been hankering for a long time on the honor of women.@BJP4Karnataka pic.twitter.com/jn394nc1Mr— ABHAY KUMAR SHAW (@abhaykuumarshaw) October 23, 2022
माफी मागितली
दरम्यान, हा सगळा प्रकार घडल्यानंतर मंत्री सोमण्णा यांनी सदर महिलेची माफी मागितली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कर्नाटकचे तत्कालीन कायदामंत्री जे. सी. मधुस्वामी यांचाही अशाच प्रकारचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तसेच भाजप आमदाराने तक्रार करायला आलेल्या महिलेच्या हातातील कागद फाडल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.
ಸ್ತ್ರೀ ಉದ್ಧಾರಕರಂತೆ ಕೇವಲ ಬೂಟಾಟಿಕೆಯ ಮಾತಾಡುವ ಬಿಜೆಪಿಗರೇ,
ನಿಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಅರವಿಂದ ಲಿಂಬಾವಳಿಯವರು ಒಬ್ಬ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಯಾಗಿ ಮಹಿಳೆಯೊಂದಿಗೆ ಅನುಚಿತವಾಗಿ ನಡೆದುಕೊಂಡ ರೀತಿ ಅಕ್ಷಮ್ಯ.
ಇಂಥ ಮಹಿಳಾ ವಿರೋಧಿ ನಡೆಯ ವಿರುದ್ಧ ಮಾತಾಡುವ ಧೈರ್ಯ ತೋರುತ್ತೀರಾ?
ಅರವಿಂದ ಲಿಂಬಾವಳಿಯವರು ಆ ಹೆಣ್ಣಿನ ಕ್ಷಮೆ ಕೇಳುತ್ತಾರ?#MahilavirodhiBJP pic.twitter.com/SqRDKXsyif
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) September 3, 2022




























































