
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती स्वतः कार्तिकने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. कार्तिक आर्यन सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भूल भुलय्या-2 चित्रपटामुळे चर्चेत आहे. तसेच तो गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. कार्तिकच्या ‘भूल भुलया 2’ या चित्रपटाला मिळत असणाऱ्या उदंड प्रतिसादामुळे त्याचे चाहतेही खूप खूश आहेत. मात्र, त्याला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे.
कार्तिकने सोशल मिडियावर त्याचा फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये त्याने काळ्या रंगाचा सूट घातलेला दिसत आहे आणि त्याने हात जोडले आहेत. त्याने हा फोटो शेअर करत असे कॅप्शन लिहिले आहे की, ‘सगळं एवढं पॉझिटिव्ह सुरू होतं, त्यामुळे कोरोनाला पण राहावलं नाही. हे वाचून चाहते नाराज झाले आहेत, पण त्याच्या या विचित्र स्टाइलने माहिती देण्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हसूही आले आहे.
Sab kuch itna Positive chal raha tha,
Covid se raha Nahi Gaya 😂 pic.twitter.com/vYlXAUsOyl— Kartik Aaryan (@TheAaryanKartik) June 4, 2022
कार्तिकला याआधी देखील झाली होती कोरोनाची लागण
भूल भुलय्या-2 च्या शूटिंग दरम्यान कार्तिकला कोरोनाची लागण झाली होती. पण काही दिवसानंतर कार्तिकचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता आता पुन्हा एकदा कार्तिकला करोनाची लागण झाली आहे. लवकर कार्तिकचा शहजादा हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत.



























































