शिर्डीत गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त; एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । शिर्डी

शहरातील द्वारावती भक्तनिवासाजवळ एक इसम गावठी कट्टा व जिवंत काडतुसे विक्री करण्याच्या उद्देशाने आला असता त्यास शिर्डी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे गावठी पिस्तुल व तीन जिवंत काडतुसे हस्तगत केली आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

द्वारावती भक्त निवासचे गार्डन जवळ रिंगरोडला एक इसम देशी बनावटीचे पिस्तुल विक्री करण्याच्या उद्देशाने येत असल्याची माहिती मिळाल्यानुसार पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक रोहीदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागिय पोलिस अधिकारी अभिजीत शिवथरे व पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी  पोलीस उपनिरीक्षक संदिप कहाळे, पो. हे. कॉ. बाबासाहेब काकड, पो. ना. किरण कुर्‍हे, पो. कॉ. नितीन शेलार व पो.कॉ. रामेश्‍वर वेताळ या पथकाने सापळा लावला. या सापळ्यात  संशयीत इसम हालचाल करतांना दिसला असता, त्याचेवर सदर पथकाने झडप घालुन त्यास ताब्यात घेतले. त्याची कसुन चौकशी केली असता त्याचे नाव मच्छिंद्र काशिनाथ पारखे रा. सावळीविहीर वाडी, ता. राहाता असे असल्याचे समजुन आले. त्याची झडती घेतली असता त्याचे कमरेला एक देशी बनावटीचे मॅगझीनसह पिस्तुल व दोन जिवंत काडतुस असा २५ हजार ४०० रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. गावठी कट्टा पकडण्याची आठवड्यातील शिर्डी पोलीसांची ही दुसरी कारवाई आहे.