
सामना ऑनलाईन, ठाणे
2 मार्च रोजी म्हणजेच शनिवारी ‘कविता कॅफे ‘ ह्या अभिनव कल्पनेचे दुसरे पर्व पार पडले. पुस्तकात बंदिस्त झालेली कविता ह्या प्रोजेक्टमुळे लोकांसमोर डिजिटल रुपात युट्यूब वर झळकणार आहे. ह्या सिझनमध्ये 5 कवींच्या 13 कवितांचे व्हीडियो चित्रित करण्यात आले आहेत असून त्यांचे प्रक्षेपण होणार आहे.
अरुण म्हात्रे ह्यांची ‘आभाळ निळे’ ही कविता युट्यूबवर प्रसारीत करण्यात आली आहे. त्यांच्या कवितेनंतर अशोक नायगांवकर, तुकाराम धांडे, संभाजी भगत, चंद्रशेखर सानेकर आणि अरुण म्हात्रे ह्यांची काव्यमैफिल शनिवारी आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाची सांगता कौशल इनामदार यांनी गायलेल्या पाडगावकरांच्या कवितेने झाली.
































































