
सामना ऑनलसाईन । नवी दिल्ली
देशभरात सध्या कापरे भरणारी थंडी पडली असून पर्वती भागांमध्ये हिमवृष्टी सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे पर्वतांवर, रस्त्यावर, गाड्यांवर सर्वत्र बर्षाची चादर पसरली आहे. त्यामुळे हा परिसर स्वर्गाहूनही सुंदर भासत आहे. याच दरम्यान सर्वात आकर्षक आणि मंत्रमुग्ध करून टाकणारा नजारा केदारनाथ येथे दिसला.
केदारनाथ येथे गेल्या काही दिवसात हिमवृष्टी सुरू असून त्यामुळे केदारनाथ धाम मंदिरावर व परिसरात बर्फच बर्फ साचला आहे. याच दरम्यान केदारनाथ मंदिराचे अलौकिक रूप कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. मंदिराच्या मागच्या बाजूस असणाऱ्या पर्वतांवर हिमवृष्टीमुळे बर्फ साचला असून ढगं दिसत आहेत. याच ढगामधून मध्येच डोकावणाऱ्या सूर्याची किरणे मंदिरावर पडल्यानंतर जे रूप समोर आले ते पाहताना हरखून गेल्यासारखे होते. पाहा खालील फोटो गॅलरी…
























































