
केरळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या गाडीत एका 19 वर्षीय मॉडेवर सामुहीक बलात्कार झाल्याची संतापजन घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका महिलेसह चार लोकांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कक्कानाडमध्ये राहणाऱ्या पिडीतेला तिच्या राजस्थानी मैत्रीणीने डीजे पार्टीसाठी बोलावले होते आणि त्यावेळी या तीन आरोपींशी ओळख करुन दिली होती. मात्र त्यानंतर दारुच्या नशेत धुंद असलेल्या तीन आरोपींनी त्या मॉडेलला गाडीत घेऊन गेले आणि तिच्यासोबत सामुहीक बलात्कार केला.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, वैद्यकीय पुराव्यावरून ती जखमी झाल्याचे समजते. गुन्हा केल्यानंतर लोकांनी पीडितेला कक्कनड येथे सोडले. एका खासगी रुग्णालयाने पोलिसांना माहिती दिल्याने हा प्रकार उघडकीस आला. पीडितेला शुक्रवारी तिच्या मैत्रिणीने याच रुग्णालयात दाखल केले.
आरोग्य, महिला आणि बालविकास मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, कोचीमध्ये मुलीसोबत झालेल्या सामूहिक बलात्काराची घटना धक्कादायक आहे. या घटनेचा तीव्र निषेध करतो. याप्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. मुलीवर योग्य उपचार व्हावेत यासाठी सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
























































