
आशिया खंडातील अग्रगण्य केईएम रुग्णालयाने मागील महिन्यात 97 वर्षे पूर्ण केली. आता 100 व्या वर्षाकडे वाटचाल सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्याशी केलेली बातचीत
केईएममध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस का वाढतेय?
हे सुपरस्पेशालिटी रुग्णालय आणि प्रशिक्षित अनुभवी डॉक्टर्सकडून उत्कृष्ट उपचार मिळतात. खासगी रुग्णालयात महागडे उपचार आहेत, पण येथे गरीबांवर विविध सरकारी योजनांमधून मोफत उपचार होतात. पुअर बॉक्स चॅरिटी फंडही आहे. उत्तम उपचार होत असल्याने रुग्णांची गर्दी वाढतेय.
रुग्णालयात बेड, आयसीयू, व्हेंटिलेटर, चादरी मिळत नसल्याच्या तक्रारी येतात
रुग्णालयात दररोज अठराशे रुग्ण दाखल असतात आणि दररोज अडीचशे ते तीनशे रुग्णांची भर पडते. त्यामुळे थोडय़ा अडचणी निर्माण होतात. आता आम्ही 32 खाटांचा एमआयसीयू केला. लवकरच बारा बेडचा अॅनेस्थेशिया, प्रत्येकी आठ बेडचा न्युरोसर्जरी व न्युरॉलॉजी विभागाचा आयसीयू सुरू होतोय. आयसीयू व व्हेंटिलेटरची संख्या वाढवतोय.
100व्या वर्षाकडे वाटचाल करतानाच्या नव्या योजना कोणत्या?
यानिमित्त सेन्टेनरी भवन वन व सेन्टेनरी भवन टू अशा दोन इमारती बांधण्यात येतील. सेन्टेनरी भवन वनचे लवकरच भूमिपूजन होईल. पुढील वर्षात अस्थिव्यंग विभागात रोबोटद्वारे शस्त्र्ाक्रिया सुरू होईल. त्याशिवाय मल्टिस्पेशालिटी रोबोट घेणार आहोत. हा मल्टिस्पेशालिटी रोबोट युरॉलॉजी, नाक-कान-घसा, जनरल सर्जन, स्त्र्ााrरोग विभागात शस्त्र्ाक्रियांसाठी वापरला जाऊ शकेल.

























































