
बॉलिवूडचे प्रसिद्ध पार्श्वगायक केके यांच्या पार्थिव शरीरावर आज वर्सोवा स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. केके यांच्या मुलाने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
#WATCH | The mortal remains of singer #KK are being taken to Mumbai’s Versova crematorium for last rites. pic.twitter.com/XZqHsrtfXE
— ANI (@ANI) June 2, 2022
केके यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. गायक हरिहरन, जावेद अख्तर, श्रेया घोषाल, उदित नारायण, आदित्य नारायण, राहुल वैद्य, तोशी साबरी, अभिजीत भट्टाचार्य, सलीम मर्चंट यांनी केके यांचे अंत्यदर्शन घेतले.



























































