कोल्हापुरातील केमिकल कंपनीला भीषण आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर येथील गोकुळ शिरगावमधील एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग लागल्याचं वृत्त आहे. कंपनीतून मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट बाहेर येताना दिसत आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

या कंपनीत असलेले सिलिंडर फुटून बाहेर पडताना दिसत आहेत. या कंपनीच्या आजूबाजूलाही कंपन्या आहेत. सुदैवाने त्या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. मात्र, या आगीमुळे त्या कंपन्याही आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आग पसरू नये यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.