कोल्हापुरात मृतांचा आकडा हजार पार, 24 तासात 891 कोरोना रुग्ण वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत ८९१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण बाधीतांची संख्या ३३ हजार १११ वर पोहोचली आहे. आजही कोल्हापुर, इंचलकरंजी शहर तसेच हातकणंगले, करवीर, पन्हाळा आदी तालुके कोरोनाचे हाॅटस्पाॅट ठरले आहेत.

चोवीस तासांत कोरोनामुक्त झालेल्या ७०२ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण २१ हजार ४४१ कोरोना मुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शिवाय गेल्या चोवीस तासांत २५ जणांचा व आतापर्यंत १ हजार १० बाधीतांचा मृत्यू झाला असुन, सध्या एकूण १० हजार ६६० पॉझीटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडुन मिळाली.