लंडनच्या ट्रकवर धावणार कोंकणी विद्यार्थ्यांची रेसिंग कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। रत्नागिरी

कार शर्यतीची काहीही परंपरा नसलेल्या कोकणातील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चिकाटी, संशोधन आणि परिश्रमांच्या बळावर निर्माण केलेली ‘महालक्ष्मी-4’ ही रेसिंग कार येत्या जुलैमध्ये लंडनच्या सिल्व्हर स्टोन सर्किट ट्रकवर धावणार आहे. या अपूर्व कामगिरीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे आय मेक फॉर्मुला स्टुडंट या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे 1998 पासून आयोजित केल्या जात असलेल्या या उपक्रमामध्ये पेट्रोल-डिझेल गटामध्ये हिंदुस्थानातून या एकमेव कारचा सहभाग असणार आहे.

संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ‘एमएच 08 रेसिंग’ हा चमू गेली चार वर्षे या कारची निर्मिती करत असून सुमारे 210 किलो वजनाची आणि आठ फूट लांबीची ही कार आता सिल्व्हर स्टोन सर्किट ट्रकवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे.