लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात; 7 जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लडाखच्या तुरतुक प्रांतात शुक्रवारी लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात झाला. 26 जवानांना परतापूर येथून लेह जिह्यातील हनीफ सब सेक्टरच्या फॉरवर्ड पोस्टकडे घेऊन जाणारे वाहन 50 ते 60 फूट खोल श्योक नदीत कोसळले. या अपघातात लष्कराचे 7 जवान शहीद झाले, तर 19 जवान गंभीररित्या जखमी झाले आहेत.
गडहिंग्लज, साताऱयाच्या जवानांना वीरमरण

लडाख येथील दुर्घटनेत बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथील जवान प्रशांत जाधव व सातारा जिल्हय़ातील विसापूर (ता. खटाव) येथील जवान विजय शिंदे यांनाही वीरमरण आले.