आधी आपलं घर सांभाळावं, मग कश्मीरची चिंता करा…आफ्रिदीचा पाकड्यांना घरचा आहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। लाहोर

पाकिस्तानला स्वत:ची ४ राज्य नीट सांभाळता येत नाहीत. यामुळे आधी त्यांनी आपलं घर सांभाळाव. उगाच कश्मीरची चिंता करू नये. असे वादग्रस्त विधान करत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी याने पाकिस्तानला घरचा आहेर दिला आहे. इंग्लंडमधील आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात तो बोलत होता.

आफ्रिदी त्याच्या ‘शाहीद आफ्रिदी’ या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यक्रमास इंग्लंडमध्ये आला होता. यावेळी तिथे काही विद्यार्थीही आले होते. त्यांनी आफ्रिदीला जम्मू-कश्मीर बद्दल विचारले असता त्याने पाकिस्तानला त्यांची ४ राज्यही नीट सांभाळता येत नाहीत. असे असताना उगाच कश्मीरची चिंता न करता त्यांनी आधी आपलं घर सांभाळावं असे विधान केले. या विधानानंतर पाकिस्तानमध्ये अनेकांनी आफ्रिदीचा निषेध केला.

जम्मू-कश्मीर मुद्द्यावर आफ्रिदीने याआधीही वक्तव्य केले होते. गेल्या वर्षी टी-२० विश्वकप सामन्या दरम्यान आफ्रिदेने आम्हाला समर्थन देण्यासाठी काहीजण कश्मीरमधून आले होते. त्यांचे मी आभार मानतो असे म्हटले होते. या विधानावरूनही वाद निर्माण झाला होता. आफ्रिदीने स्वतंत्र कश्मीरचे समर्थन करतानाही अनेक वादग्रस्त ट्वीट केले होते. त्याने 2017 मध्ये कश्मीर एक स्वर्ग असून गेल्या काही दिवसांपासून तेथे हिंसाचार उसळला आहे. कश्मीरचा प्रश्न सोडवण्याची हीच ती योग्य वेळ आहे . मी कश्मीरच्या बाजूने आहे. असेही आफ्रिदीने म्हटले होते.

तसेच हिंदुस्थानच्या ताब्यात असलेल्या कश्मीरमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. तिथे निष्पाप नागरिकांना ठार केले जात आहे. पण संयुक्त राष्ट्र यात हस्तक्षेप करत नसल्याचे बघून मी हैराण झालो आहे. असेही त्याने म्हटले होते.