
लातूर शहरातील एका शाळेतून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या भावाने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, डॉ. झाकीर हुसेन कन्या हायस्कूल उर्दु माध्यमात त्यांची अल्पवयीन बहिण शिक्षण घेत होती. सकाळी स्कूल व्हॅनने ती शाळेत गेली; मात्र नंतर घरी परत आलीच नाही. व्हॅनचालकाशी संपर्क केला असता त्याने ती शाळेतच आली नसल्याचे सांगितले.
या घटनेबाबत शाळेतील शिक्षकांकडे विचारणा केली असता सकाळच्या मध्यंतरामध्ये तिने शिक्षकांच्या मोबाईलवरून फोन केला आणि भावाला बोलावून घेतले आहे, असे सांगून त्याच्यासोबत ती निघून गेली असल्याचे सांगितले. सर्व नातेवाईकांकडे चौकशी केली, मात्र ती कुठेच सापडली नाही. अज्ञात व्यक्तीने तिला पळवून नेले म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.





























































