लातूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येने 14 हजाराचा टप्पा ओलांडला, 24 तासात 11 मृत्यू

लातूर जिल्ह्यात मागील २४ तासामध्ये तब्बल ११ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून कोरोनाबाधित रुग्णसंख्येने १४ हजाराचा टप्पा ओलांडला आहे. आज नव्याने २८५ रुग्ण वाढलेले आहेत.

सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा कहर अधिक वाढलेला आहे. मागील पाच दिवसांपासून लातूर जिल्ह्यात दररोज १० किंवा त्यापेक्षा अधिक रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू होत आहे. मागील २४ तासामध्ये ११ रुग्णांचा मृत्यू झालेला असून आजपर्यंत तब्बल ४१३ रुग्णांचा मृत्यू जिल्ह्यात झालेला आहे. नव्याने २८५ पॉझिटीव्ह रुग्ण वाढलेले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता १४०५९ वर पोहोचलेली आहे. सध्या ३००६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर १०६४० रुग्ण उपचाराने बरे होऊन घरी परतलेले आहेत.

जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यात ५९१२ कोरोनाबाधित रुग्ण वाढलेले होते. परंतू सप्टेंबर महिना अधिकच धोकादायक ठरत आहे. केवळ १८ दिवसांमध्येच तब्बल ५९४७ रुग्णसंख्या वाढलेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या