‘आठवणीतले बाळासाहेब’ या विषयावर व्याख्यान 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना शाखा क्र. 218 आणि युवक उत्कर्ष मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला ‘आठवणीतले बाळासाहेब’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले आहे. मंगळवार, 16 नोव्हेंबरला सायंकाळी 7 वाजता शिवसेना गिरगाव शाखेसमोर व्याख्यान होणार आहे. प्रमुख वत्ते म्हणून शिवसेना नेते, उद्योग मंत्री सुभाष देसाई, शिवसेना उपनेते, खासदार अरविंद सावंत, ज्येष्ठ पत्रकार अजय वैद्य उपस्थित राहणार आहेत. शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, राजकुमार बाफना, उपनेत्या मीना कांबळी, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, विभाग संघटक जयश्री बळ्ळीकर यांची या वेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती शाखाप्रमुख बाळा अहिरेकर, नयना देहेरकर आणि आयोजक दिलीप नाईक यांनी दिली.