
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
सैन्यात समलिंगी संबंधांना मान्यता नसल्याचे सैन्यप्रमुख बिपीन रावत यांनी स्पष्ट केले आहे. त्याचे कारण सैन्याची विचारसरणी ही रुढीवादी असल्याचे त्यांनी म्हटले. समलैंगिक संबंधांवर सैन्याचे स्वतःचा कायदा असल्याचेही त्यांनी नमूद केले. सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक सबंधांना मान्यता दिली असून या सबंधांना कायदेशीर ठरवले आहे. रावत यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद उभा राहू शकतो.
Army Chief General Bipin Rawat addressing an annual press conference in Delhi: For LGBT (lesbian, gay, bisexual and trans) issues, in the Army these are not acceptable. We will still be dealing with them under various sections of the Army Act. pic.twitter.com/CKegft94in
— ANI (@ANI) January 10, 2019
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही सैन्यात समलैंगिक संबंधांना मान्यता नसल्याचे रावत यांनी म्हटले. रावत म्हणाले की, “हिंदुस्थानी सैन्य खूप रुढीवादी आहे. आणि सीमेवर तैनात असलेला जवान आपल्या कुटुबीयांचा विचार नाही करू शकत. हाच विचार समलिंगी समुदायाला लागू होतो. सैन्यात आम्ही या संबंधांना मान्यता नाही देऊ शकत.”
अशा प्रकराच्या घटना रोखण्यासाठी सैन्याच्या कायद्यात तरतूद असल्याचेही त्यांनी म्हटले. वार्षिक पत्रकार परिषदेदरम्यान राव यांना समलिंगी संबंधावर प्रश्न विचारल्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
























































