बटाट्याने उजळवा चेहऱ्याचा रंग; ‘हे’ करा सोपे घरगुती उपाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी आहाराप्रमाणे सौंदर्यवाढीसाठीसुद्धा बटाटा उपयुक्त आहे. त्वचेचा रंग उजळणे, चेहऱ्याच्या सौंदर्यवाढीबाबत महिला सजग होऊ लागल्या आहेत. जाणून घेऊया सौंदर्यवाढीसाठी, त्वचेचा रंग उजळण्यासाठी करायचे बटाट्याचे सोपे उपाय !

मध आणि बटाटा

चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी बटाट्याच्या रसात मध व्यवस्थित मिसळा. त्यानंतर चेहरा आणि मानेला हा रस व्यवस्थित लावा. काही वेळाने स्वच्छ पाण्याने धुवा. हा फेस मास्क रोज लावल्याने त्वचा मुलायम आणि चमकदार होते.

बटाटा आणि लिंबू

बटाटा आणि लिंबाचा फेस पॅक लावल्याने चेहऱ्याची त्वचा उजळते. हा पॅक बनवण्यासाठी 2 चमचे बटाट्याच्या रसात 2 चमचे लिंबू आणि मध मिसळा. तिन्ही पदार्थ व्यवस्थित मिसळल्यानंतर हा पॅक चेहऱ्यावर लावा. सुकल्यावर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे त्वचा स्वच्छ राहायला मदत होते.

बटाटा आणि टमाटर

बटाट्याची पेस्ट घ्या. त्यामध्ये एक चमचा टोमॅटो आणि एक चमचा मध घाला. आता हे मिश्रण व्यवस्थित मिसळा. हे मिश्रण चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर ओले करून मसाज करा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा.