
व्यक्तिच्या जीवनात जेव्हा काही वाईट घटना घडतात, तेव्हा बऱ्याचदा नशिबाला दोष दिला जातो, मात्र आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक अशुभ घटनेमागे काही ना काही कारण असू शकते. काही वेळा आपल्याला असलेल्या वाईट सवयींमुळे आपल्या जीवनात काही अशुभ घटना घडू शकतात. जाणून घेऊया, काही चुकीच्या सवयींविषयी ज्या टाळल्यास तुमचे नशीब बदलू शकते.
नखे कुरतडणे
बऱ्याच जणांना नखं कुरतडण्याची वाईट सवय असते. सतत वाढलेली नखं तोंडात धरून ही लोकं कुरतडत असतात. यामुळे कुंडलीतील सूर्य ग्रह कमजोर होऊ शकतो, असे ज्योतिष तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नखे कुरडतण्याच्या वाईट सवयीमुळे अपयश येऊ शकते तसेच सामाजिक स्तरावर अपमानास्पद घटना घडू शकतात.
पाय जमिनीला घासून चालणे
काही लोकांना पाय जमिनीला घासून चालण्याची सवय असते. वैवाहिक जीवनावर या सवयीचा परिणाम होऊ शकतो. पती-पत्नीमध्ये विनाकारण भांडणे होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी चालताना पाय उचलून चालण्याचा प्रयत्न करावा.
विखुरलेली पादत्राणे
जे लोक घरात बूट किंवा चप्पल पसरून ठेवतात. त्यांच्याही आयुष्यात या वाईट सवयीमुळे नकारात्मक परिणाम होऊ शकतो. असे केल्यामुळे अनावश्यक धावपळ वाढते. त्यामुळे व्यक्तिला यश मिळणे अवघड होते.
घराच्या परिसरात घाण
ज्योतिष तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, घरात किंवा घराच्या आजूबाजूला दुर्गंधी असल्यास कुंडलीतील शुभ योग नष्ट होतात. यामुळे जीवनात घडणाऱ्या शुभ घटना घडताना अडचणी येऊ शकतात. जीवनात सुख-समृद्धीकरिता बरेच प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे घर आणि घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणेही आवश्यक आहे.
अस्ताव्यस्त स्वयंपाकघर
बऱ्याच लोकांच्या स्वयंपाकघरात पसारा असतो. वस्तू अस्ताव्यस्तपणे ठेवलेल्या असतात. भांडी, वाणसामानाचे डबे तसेच इतर सामान जागच्या जागी ठेवलेलं नसतात किंवा इतर सामानही विखुरलेलं असतं. ही सवय आर्थिक नुकसान होण्याला कारणीभूत ठरते. घरखर्चात वाढ होते आणि पैसा टिकत नाही.



























































