रापण संघाच्या होडीवर वीज कोसळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवण किनारपट्टीवरील रविवारी सायंकाळी लखलखाट व गडगडाटासह जोरदार पावसाने तडाखा दिला. देवबाग येथील मडईकर रापण संघाच्या होडीवर वीज पडल्याने होडी फुटून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. यावेळी किनारपट्टीवर असलेले दोन मच्छीमार जखमी झाले आहे. मडईकर रापण संघाने रविवारीच मासेमारीसाठी होडीचा मुहूर्त केला होता. मात्र याच होडीवर वीज पडल्याने त्यांच्या व्यवसायावर मोठे संकट कोसळले आहे.

देवबाग सांताक्रूझवाडी येथील मडईकर रापण संघाच्या होडीवर वीज कोसळली. यात पूर्ण होडी फुटन गेली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र मडईकर रापण संघाचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. होडीत जाळी नसल्याने आणखी हानी टळली. घटनेची माहिती मिळताच शिवसेना तालुकाप्रमुख जिप सदस्य हरी खोबरेकर, देवबाग सरपंच जान्हवी खोबरेकर, मनोज खोबरेकर, नागेश चोपडेकर, पोलिस पाटील भानुदास येरागी यांनी भेट देत पाहणी केली.