घरात पाळला जंगली प्राणी, मालकिणीसमोरच मुलाला केले ठार

घरात पाळीव प्राणी पाळण्याची आवड अनेकांना असते. बहुतांश लोकांना घरात कुत्रे किंवा मांजर पाळायला आवडते, पण जर तुम्हाला सांगितले की, कोणीतरी घरात सिंह पाळला होता, यावर तुमचा विश्वास बसेल का ?  नाही ना ?  पण हे खरे आहे. एका कुटुंबाने घरात सिंह पाळण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना त्याचे फारच वाईट परिणाम भोगावे लागले.

ही घटना 1970 च्या दशकात अझरबैजानमध्ये घडली. या देशातील बार्बरोव्ह लेव्ह या व्यक्तिने आजारी असलेल्या सिंहाला दत्तक घेण्याचा विचार केला. या सिंहाच्या पायाला इजा झाली होती. त्यामुळे कुटुंबियांनी सिंहाला आपल्या घरी आणण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बार्बरोव्ह कुटुंबियांनी त्याच्या पायावर औषधोपचार आणि मसाज केला यामुळे सिंहाचा पाय बरा झाला. या सिंहाचे नाव ‘राजा’ असे ठेवण्यात आले होते. हा सिंह त्यांच्या घरी पाळीव कुत्र्यासारखाच राहात असे. सिंह मोठा झाल्यानंतर त्याला चित्रपटात काम मिळू लागले. त्याचा मालक लेव्ह त्याचा व्यवस्थापक म्हणून काम करू लागला.

घरात नेहमी पाळल्या जाणाऱ्या पाळीव प्राण्यापेक्षा वेगळा प्राणी पाळावा, असे त्यांना वाटत होते. याकरिता त्यांनी हा सिंह पाळला होता. हे सिंह 100 चौरस मीटरच्या फ्लॅटमध्ये बेर्बरोव्ह कुटुंबासह आरामात आपले जीवन जगत होते. बार्बरोव्हचे शेजारी सिंहांना घाबरले होते. त्यानंतर पहिल्या सिंहाच्या मृत्यूनंतर या कुटुंबियांनी दुसरा सिंह पाळला. त्याचे नाव किंग होते. हा सिंह पहिल्या सिंहासारका सौम्य स्वभावाचा नव्हता. त्याच्या सवयी आणि इच्छाही वेगळ्या होत्या. जोपर्यंत सिंहांचा मालक लेव्ह जिवंत होता तोपर्यंत तो त्याचे सर्व ऐकत असे, मात्र काही दिवसांनी लेव्हचा मृत्यू झाला. त्यानंतर तो कोणाचेच ऐकेना. लेव्हची पत्नी नीना त्याला दुसरीकडे कुठेतरी हलवण्याचा विचार करत होती, मात्र एके दिवशी भयंकर घटना घडली. नीना कार्यालयातून घरी परतली तेव्हा घर अत्यंत अस्वच्छ झाले होते. सिंहाला पकडण्यासाठी ती खोलीत गेली असता त्याने तिच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी तिला वाचवण्यासाठी तिचा 14 वर्षीय मुलगा रॉबिन पुढे आला. तेव्हा सिंहाने त्याच्यावर हल्ला करून त्याला जागच्या जागीच ठार केले. हे पाहून नीना बेशुद्ध पडली आणि जेव्हा पोलिसांनी राजाला गोळ्या घातल्या तेव्हा तिचे डोळे उघडले.