
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संभाजीनगर येथील ऐतिहासिक सभेने गर्दीचे सर्व विक्रम मोडले…. मराठवाड्याच्या इतिहासातील अतिविशाल, अतिअतिविराट सभा… असेच म्हणावे लागेल अशी ही सभा होती… सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पाय ठेवायलाही जागा नाही… मैदानाबाहेरही तेवढीच गर्दी… अशी स्थिती यावेळी पाहायला मिळाली…
मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक बुधवारी संभाजीनगरात दाखल झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद… अशा गगनभेदी घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला होता. उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी सारा समूदाय उत्सुक होता. उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक मुद्द्यावर शिवसैनिक उत्स्फूर्त प्रतिसाद देत असल्याचे पाहायला मिळत होते…
- आमचे हात ढेकणे चिरडण्यासाठी नाही, तर हिंदुत्व रक्षणासाठी आहे.
- आमचे हिंदुत्व गदाधारी आहे, गधाधारी नाही, गध्यांना आम्ही सोडले आहे.
- शिवसेना जनाजनात रुजली आहे, तुमच्या कितीही पिढ्या आल्या तरी शिवसेनेला हलवू शकत नाही
- प्रत्येक संकटात धावून जातो, तो शिवसैनिक असतो.
- कुठे नेऊन ठेवणार आहात, हिंदुस्थान माझा, हा सवाल भाजपला विचारायला हवा.
- त्यांनी कधीही हिंदूचे सण, त्यांचा आनंद बघितला नाही, फक्त हिंदूच्या नावाखाली राजकारण केले.
- गणेश स्थापनेच्या दिवशी महागाईविरोधात भाजपने बंद आयोजित केला होता, त्याला आम्ही पाठिंबा दिला नाही
- कश्मिरी पंडितांना कश्मीर सोडण्याची वेळ का येत आहे, हे कोणाचे अपयश आहे
- कश्मिरी पंडितांसाठी आपण सर्वतोपरी मदत करत आहोत
- ईडी, सीबीआयच्या धाडी टाकण्याऐवजी कश्मीरमध्ये धाडी टाका, ती हिंमत दाखवा
- अनेक गुंतवणूकदार राज्यात येण्यासाठी उत्सुक आहे, ते भाजपला बघवत नाही
- गुंठेवारीचा प्रश्न सोडवला आहे. जंग सफारी सुरू होत आहे.
- आपल्या सरकारने संभाजीनगरच्या पाणीपट्टीचे दर कमी केले आहे.
- पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या प्रमुखांना बोलवावे, कोणत्या विषयावर बोलायचे, कशावर बोलायचे नाही, ते स्पष्ट करा, मात्र जे ठरेल त्याप्रमाणे करा, असे आपले आवाहन असल्याचे ते म्हणाले
- निवडणुकीआधी भूलथापा मारायच्या आणि निवडून आल्यावर विसरून जायचे
- पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी आहे की विमा कंपन्यांसाठी आहे, हे केंद्राने सांगावे
- गोपीनाथ मुंडे यांच्या विनंतीवरून शिवसनाप्रमुखांनी संभाजीनगरचे उपमहापौरपद भाजपला दिले होते.
- शिवसेनाप्रमुख कधी कागदावर आकडेमोड करत नव्हते, त्यांचा दिलेला शब्द कायम असायचा
- कितीजण तुमच्यासोबत सत्तेसाठी आले होते आणि कितीजण मैत्रीसाठी आले होते, त्याचा विचार करा
- ज्यांच्याशी आपले राजकीय वैर होते, त्यांनी आपल्याला मानसन्मान देत मैत्री केली
- 30 वर्षे मैत्री करून ते आपल्या छातीवर नाचायला लागले
- सरकार आज पडणार. उद्या पडणार आणि मी मुख्यमंत्री होणार अशी स्वप्ने बघाऱ्यांनी कळलेही नाही की अडीच वर्षे निघून गेली
- राज्याचा होत असलेला विकास त्यांना दिसत नाही
- मंदिरांचे, गड किल्ल्याचे जतन करण्यासाठी प्रयत्न केले आहे
- समृद्धी महामार्गाचा एक वळसा जालन्यापर्यंत नेणार आहोत.
- भाजप सुपारी देत भोंगा आणि हनुमान चालीसाचे राजकारण करत आहे.
- आजही अनेक मुस्लीम शिवसैनिक उपस्थित आहेत.
- दावोसमध्ये महाराष्ट्रामध्ये गुतंवणुकीसाठी सर्वात जास्त गर्दी झाली होती.
- आता परिस्थिती सुधारत आहेत. गुतंवणूकदार राज्यात येत आहेत
- कोरोनामुळे शिक्षण ,रोजगार यांचे मोठे नुकसान झाले आहे
- मी उद्धव ठाकरे मी शून्य आहे. मध्ये बाळासाहेब हे नाव आहे म्हणून तुम्ही माझ्यावर प्रेम करता.
- भाजपच्या तिनपाट प्रवक्त्यामुळे देशावर नामुष्की ओढवली आहे.
- आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा फोटो कचराकुंडीजवळ लावला
- शिवसेनाप्रमुखांनी कधीही इस्लाम किंवा मुस्लीमांचा द्वेष कधीही केला नाही.
- आम्ही त्या भाषेत उत्तर दिलेले नाही, मात्र, आमच्या संयमाची अंत पाहू नका
- भाजपने बेलगाम बोलणाऱ्या नेत्यांना आवर घालावा.
- आमचे हिंदुत्व राष्ट्रीय आहे.
- आमच्यासोबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व आहे.
- आज कश्मीरात काय परिस्थिती आहे, हिंमत असेल तर कश्मीरात हनुमान चालीसा पठण करा.
- हिंदुत्वाचे धडे तुमच्याकडून घेण्याएवढे आम्ही पोकळ हिंदुत्ववादी नाही
- बाबरी पडल्यानंतर भाजपवाल्यांची पळापळ झाली होती, त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी निडर भूमिका घेतली होती
- हिंदुत्वासाठी आम्ही आणि त्यांनी काय काय केले, ते एका खुल्या मंचावर होऊन जाऊ द्या
- इथे आक्रोश करणाऱ्यांनी दिल्ली दरबारी जाऊन आक्रोश करावा, या मागण्या मान्य करण्यासाठी पाठपुरावा करा.
- या शहराचे नामकरण संभाजीनगर असे करण्यात येईल, त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना आदर्श वाटेल,असे हे शहर आहे.
- याबाबतचा ठराव केंद्राकडे दिला आहे, त्यावर काहीही होत नाही
- या शहराचे नाव शिवसेनाप्रमुखांनी संभाजीनर असे केले आहे.
- विकास करताना शहर विद्रुप होणार नाही, याकडे लक्ष देत आहोत.
- शहरातील रस्ते सुधारत आहेत, अनेक योजना राबवण्यात येत आहेत
- खोटे बोलणे हे आमचे हिंदुत्व नाही
- पाणीपुरवठा योजनेसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.
- जुनी योजनाही पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
- संभाजीनगरला पाणी पुरवठा करण्यासाठी अनेक योजना सुरू आहेत.
- ढेकण चिरडण्यासाठी आपल्याला शिवसैनिकांची शक्ती वाया घालवायची नाही.
- या गर्दीत तुळजाभवानीचे दर्शन होत आहे.
- आज एवढ्या वर्षांनंतर सभेसाठी आलो आहे. मैदानाचा कोपरा आणि कोपरा भरला आहे.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाला सुरुवात
- पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वागत
- महाराष्ट्राला शिवसेना म्हणजे काय हे दाखवणारी आजची ही सभा आहे.
- देशातील जनता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाकडे लक्ष लावून बसली आहे.
- राज्यातील ठाकरे सरकारने देशाला एक दिशा दिली आहे.
- केंद्र सरकार ज्ञानवापी ,ताजमहालाखालील शिवलिंग असे विषय पुढे करत आहे
- प्राण जाय पर वचन न जाय, हिंदुत्वासाठी शिवसेना याच धोरणाने काम करत आहे – संजय राऊत
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यासपीठावर आगमन
- याच मराठवाड्याने औरंगजेबाला गाडले, निजामाला पळवून लावले
- मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणारी औलाद आजपर्यंत जन्माला आलेली नाही.
- मराठवाड्यात अनेक वर्षांनी अशी विराट सभा होत आहे. हा ऐतिहासिक क्षण आहे.
- शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या संबोधनाला सुरुवात
- संभाजीनगरवासियांना दिलेला शब्द पूर्ण केल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही
- जिल्ह्यातील पाणीटंचाई कमी झाी असून भूजल पातळी वाढली आहे,त्यासाठी सरकारने विविध योजना आखल्या.
- या सभेतील गर्दीने शिवसेनेने आपलाच याआधीचा गर्दीचा विक्रम मोडला आहे.
- शिवसेना नेते, जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या संबोधनाला सुरुवात
- या शहरात शिवसेनेचा भगवा फडकणार असा विश्वास व्यक्त केला.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे कुटुंबिय आणि शिवसेना नेत्यांविषयी भाजपची बेताल वक्तव्ये सहन करणार नाही.
- हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराचे नाव संभाजीनगर केले आहे.
- शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या संबोधनाला सुरुवात
रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या संबोधनाला सुरुवात
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संबोधनाला सुरुवात
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये पोहचले
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संभाजीनगर विमानतळावर आगमन
संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विराट सभा होत आहे. त्या सभेसाठी जमलेली गर्दी. pic.twitter.com/E1UmiZxb0P
— Saamana (@SaamanaOnline) June 8, 2022
- उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी हजारो शिवसैनिक संभाजीनगरात दाखल
View this post on Instagram
- शिवसेना नेत्यांकडून सभास्थळाची पाहणी
View this post on Instagram
- उद्धव ठाकरे यांच्या संभाजीनगर महासभेची तयारी पूर्ण
होय… संभाजीनगरच!
मराठवाड्यात सर्वप्रथम स्थापन झालेल्या शिवसेना संभाजीनगर शाखेच्या ३७ व्या वर्धापन दिनी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा.
वेळ:- बुधवार दि. ८ जून २०२२, सायं. ६:०० वाजता
स्थळ:- मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, संभाजीनगर pic.twitter.com/wq0UCsLxce— ShivSena – शिवसेना (@ShivSena) June 8, 2022





























































