राज्यात 15 दिवस संचारबंदी लागू होणार -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • ही लढाई जिंकण्यासाठी सर्वांनी एकत्र या आणि सहकार्य करा.
  • टीका करणारे कितीही टीका करोत, जनतेच्या हितासाठी हे निर्बंध घालत आहे.
  • जनतेचा जीव वाचवण्यासाठीच हे निर्बंध घातले आहेत.
  • रुग्णवाढ झाल्यास त्याची गरज आणखी वाढणार आहे.
  • राज्यात सध्या दररोज 40 ते 50 हजार रेमडेसीवीर इंजेक्शनची गरज आहे.
  • निर्बंधाच्या काळात कोविड सोयीसुविधा वाढवण्यार भर देणार
  • परवानाधराक रिक्षाचालकांनाही 1500रुपये देणार
  • अधिकृत फेरीवाल्यांना 1500 रुपये देणार
  • नोदणीकृत घरकामगारांनाही निधी देणार
  • रोजी थांबेल पण सरकार रोटी थांबू देणार नाही.
  • शिवभोजन थाळी गरीबांना महिन्याभर मोफत देणार
  • सुमारे 7 कोॉी लाभार्थ्यांना याचा लाभ होणार
  • अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महिन्याभराची अन्नधान्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
  • हॉटेल, रेस्टॉरंटमधून पार्सल नेता येईल.
  • अत्यावश्यक सेवासाठी सार्वजनिक वाहतूक सुरू राहणार
  • सकाळी 7 ते रात्री 8 अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
  • योग्य काराणाशिवाय घराबाहेर पडू नका
  • राज्यात 15 दिवस संचारबंदी लागू करावी लागणार
  • बुधवारी रात्री 8 वाजेपासून निर्बध लागू होतील
  • आता काही कठोर निर्बंध घालणे गरजेचे आहे
  • एकजुटीने या संकटाचा समाना करायचा आहे.
  • ही उणीदुणी काढण्याची, राजकारणाची वेळ नाही
  • त्यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत.
  • आरोग्य सेवा वाढवल्यावर डॉक्टर्सची गरज लागणार आहे.
  • वाढवलेल्या आरोग्य सेवाही कमी पडत आहे. मात्र, आपण सर्व समस्यांचा मुकाबला करणार आहोत.
  • गेल्या लाटेपेक्षा ही लाट मोठी आहे. त्यात किती वाढ होईल, ही लाट कधी नियंत्रणात येईल, हे सांगणे कठीण आहे
  • लसीकरणामुळे आगामी लाटेचा वेग कमी करण्यासाठी मदत होणार आहे.
  • आताची लाट प्रंचड मोठी आहे. काही गोष्टी करूनच यातून बाहेर पडावे लागणार आहे.
  • लसीकणाचा वेग वाढवणे आवश्यक आहे.
  • आपत्ती बिकट असून त्यावर औषध नाही फक्त लस आली आहे.
  • जीएसटी परताव्याला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणीही केंद्राला केली आहे.
  • त्यासाठी हवाई वाहतूक आणि लष्काराची मदत मिळण्यासाठी मागणी केली आहे.
  • ईशान्येकडील राज्याकडून ऑक्सिजनच्या वाहतुकीच्या परवानगी मिळाली आहे. मात्र, त्यात वेळ जाणार आहे.
  • केंद्राकडे ऑक्सिजनची मागणी केली आहे. इतर राज्यातूनही मागणी केली आहे.
  • आपण रुग्णसंख्या लपवत नाही, पारदर्शकपणे परिस्थिती मांडली आहे.
  • बेड, ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसीवीर कंमतरता या समस्या आहेत.
  • ही वेळ हातातून निघून गेल्यास परिस्थिती बिकट होईल.
  • आपली परीक्षा आपल्याला पुढे ढकलता येणार नाही. हा काळ खूप महत्त्वाचा आहे.
  • सध्याची परिस्थिती बघता एमपीएससी, दहावी, बारावीच्या परीक्षआ पुढे ढकलल्या आहेत.
  • बेडची संख्याही वाढवली आहे. मात्र, या यंत्रणांवर ताण येत आहे.
  • चाचण्यांची संख्या वाढवली आहे. 85 हजारहून अडीचलाखांपर्यंत चाचण्या होत आहे.
  • कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. त्याची आकडेवारी भयानक आहे.
  • आता परत कोरोनाविरोधातील लढाईला सुरुवात झाली आहे.
  • जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत आर्पण कोरोनावर नियंत्रण मिळवले.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनाला सुरुवात
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंगळवारी 8.30 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत.