
भाजपविरोधात महाविकास आघाडीने वज्रमूठ उगारली असून राज्याची उपराजधानी नागपुरात विराट जाहीर सभा दणक्यात झाली आहे. या सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली आहे. त्यांनी केंद्रातील मोदी सरकार, भाजप आणि मिंध्यांचा चांगलाच समाचार घेतला.
- लोकशाही टिकवायची असेल तर वज्रमूठ आवळत एकत्र या
- खुर्च्या सोडल्या तरी, यातील काहीही भाड्याचे नाही.
- यांच्या बुरख्याआडचा त्यांचा भेसूर चेहरा आता ओळखा.
- वज्रमूठ आवळण्याचे हिंमत दाखवणार का, आता जिंकेपर्यंत लढायचे, हा निर्धार आम्ही केला आहे.
- ज्यांना मिळाला त्यांच्या शिध्याला बुरशी लागलेली आहे. त्यांच्या कारभारालाच बुरशी लागली आहे.
- राज्य सरकारचा आनंदाचा शिधा कोणाला मिळाला आहे.
- सर्व आलबेल असल्याचे दाखवण्यात येत आहे, मात्र तसे काहीही नाही.
- किती जणांना केंद्र सरकारी योजना मिळत आहे, त्या योजना फक्त जाहिरातीतच दिसतात.
- आम्ही तुम्हाला सत्ता देतो, फक्त आठ वर्षात काय केले ते सांगा, असे आव्हान त्यांनी दिले.
- गद्दारांना घेत तुम्ही सरकार चालवत आहात, ही सत्तेची नशा नाही तर काय आहे.
- सैनिक देशासाठी लढतात, ते पक्षासाठी लढत नाहीत. कारगिल युद्धानंतर तिन्ही दलातील प्रमुखांचे पोस्टर भाजपच्या सभेत लावले जात होते.
- सत्यपाल मलिक यांनी केलेले वक्तव्य गंभीर आहे, त्याची तरी ते दखल घेणार आहेत का
- यांना पर्याय कोण हा विचार करण्याची वेळ का आली आहे, त्यांना पर्याय कोणीही असेल. पण जनतेचे नुकसान करणारे आता सत्तेवर नकोत.
- देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीकारकांना प्राणांचे बलिदान केले, आता तुम्हाला एका बोटानेच क्रांती करायची आहे.
- देशाच्या स्वातंत्र्यांसाठी बलिदान देणारे क्रांतीकारक हे सत्तेवर बसावे म्हणून बलिदान केले नव्हते.
- हे असे हिंदुत्व राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, भाजप, उपमुख्यमंत्री यांना मान्य आहे काय
- त्या महिलेची तक्रार घेण्यासही पोलीस तयार नाहीत,अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री फडतूस नाही तर काय आहे.
- मातृत्वासाठी उपचार घेणाऱ्या महिलेच्या पोटात लाथा बुक्के मारणे, हे त्यांचे हिंदुत्व आहे काय
- रोशनी शिंदे या महिलेवर दिवसाढवळ्या हल्ला करतात. तिला लाथाबुक्कांनी मारहाण करण्यात आली
- ते मदरशात जाणार, मन की बात करणार, कव्वाली करणार, हे त्यांचे हिंदुत्व आहे.
- आमचे हिंदुत्व राष्ट्रीयत्व आहे, त्यांचे हिंदुत्व काय आहे, ते त्यांनी जाहीर करावे.
- आमचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही. त्यांचे गोमूत्रधारी हिंदुत्व आहे.
- आपण काँग्रेससोबत गेलो म्हणजे हिंदुत्व सोडले असे म्हणता, आम्ही काय सोडले ते सांगा
- मर्द असाल तर मैदानात या, मैदान मिळू नये, म्हणून काड्या का करता
- त्यावेळी भाजपच्या गोटात पळापळ झाली होती. शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा आम्हाला अभिमान आहे.
- बाबरी मशीदीच्या वेळा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब गेले नव्हते, असे चंद्रकांत पाटील म्हणाले
- ही बाप चोरणाऱ्यांची औलाद आहे, ते जनतेला मुलाप्रमाणे काय सांभाळणार
- राज्यात येणारे उद्योगधंदे यांनी गुजरातला पाठवले. आता आमच्यावर आरोप करत आहेत.
- कोठूनही काम करा, पण जनतेला काय पाहिजे ते द्या, फक्त भूलथापा देऊ नका.
- मी घरात बसून कारभार केला, तरी देशात पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये आपला क्रमांक होता.
- यांचा अयोध्या दौरा सुरू होता आणि राज्यातील शेतकरी संकटात असताना त्यांना अद्याप मदत मिळालेली नाही
- नळ्यासोबत गाड्याची यात्रा, याप्रमाणे उपमुख्यमंत्रीही अयोध्येला गेले होते.
- यांच्या हिंदुत्व असते तर ते आधी सूरत किंवा गुवाहाटीला गेले नसते, आधी अयोध्येला गेले असते.
- राम मंदिराचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे, त्यावर हे टिकोजीराव आम्हीच केले असा डांगोरा पिटत आहे.
- महाराष्ट्र हा शूरांचा वीरांचा आहे, पाठीत वार करणाऱ्यांचा नाही,पाठीत वार करण्याची आमची पंरपरा नाही.
- आमचे सरकार नालायक असते, तर एवढ्या मोठ्या संख्येने जनता आलीच नसती,
- हे उलट्या पायाचे सरकार आहे. त्यांनी आम्हाला फसवले म्हणून ही आघाडी झाली आहे.
- घटना बचाओ नसून आता घटनेच्या रक्षणासाठी मी पुढाकार घेणार, घटनेचे रक्षण मीच करणार, हा निर्धार करा.
- एक महामानव देशासाठी घटना लिहू शकतो. तर एवढ्या मोठ्या संख्येने आपण एकत्र आलो तर घटनेचे रक्षण करू शकतो.
- भारतमातेच्या पायात पुन्हा बेड्या घालण्याचे काम सुरू आहे.
- देशाच्या विकासाचा क्रमांक घसरत आहे, मात्र, त्यांच्या मित्राच्या श्रीमंतीत वाढ होत आहे.
- सत्तेची नशा आणि व्यसन खूप धोकादायक आहे, हे दिसून येत आहे.
- अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांचे व्यसनमुक्तीचे कार्य खूप मोलाचे आहे.
- सत्तेची मस्ती डोक्यात गेलेला कोणीही असला तरी त्याला समाजसेवा करणाऱ्यांसोमार झुकावेच लागते.
- महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवले.
- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संबोधनाला सुरुवात
- कोणत्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, आत्महत्येची वेळ आणणाऱ्यांना आता सत्तेवरून खाली खेचायचे आहे.
- विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला नाही, महामानव डॉ. बाबासाहेब आंबोडकर यांची दिक्षाभूमी आहे.
- सध्या राज्य आणि देश कठीण परिस्थितीतून जात आहे.
- जनतेचा पैसा जाहिरातबाजी आणि कंत्राटदारांवर खर्च होत आहे. मात्र शेतकऱ्यांना मदत करत नाही.
- जनतेच्या मेहनतीचा पैसा सरकार जाहिरातीबाजीवर खर्च करत आहेत.
- मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य म्हणजे कॉमेडी शो असतो. त्यांना राज्यातील समस्यांबाबत काहीही देणे घेणे नाही.
- नागपूरकरांना लुटण्याचे काम हे सरकार करत आहे, तसेच येथे पिण्याचे पाणीही मिळत नाही.
- भाजप आमच्या वज्रमूठ सभेला का घाबरत आहे, चोर की दाढीमे तिनका, हेच यातून दिसून येत आहे.
- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या संबोधनाला सुरुवात
- या वज्रमूठीला सरकार घाबरले आहे, ही वज्रमूठ अशीच राहिली तर, आपली सत्ता येणार नाही, ही भिती त्यांना आहे.
- हा जनसागर बघून सरकार घाबरत आहे, त्यामुळे निवडणुका घेण्याचे त्यांचे धाडस नाही. त्यामुळे त्यांची इव्हेंटबाजी सुरू आहे.
- कोणतेही काम न करता, विरोधात बोलणाऱ्यांना संपवण्याचे आणि तुरुंगात टाकण्याचे काम सुरू आहे.
- या सरकारने महाराष्ट्राला सूडाचे राजकारण दिले आहे. वर्षभरापासून राज्यात हेच सुरू आहे.
- विदर्भाने दिलेला पाठिंब्याचा निर्णयाचा संदेश जगभारत पोहचतो, त्यामुळे या सभेला महत्त्व आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संबोधनाला सुरुवात
- खोटी आश्वासने देणाऱ्यांच्या हातात सध्या आपला देश आहे, देशात लोकशाही राहील की नाही, अशी परिस्थिती आहे.
- यासह अनेक प्रश्नांची उत्तरे जनतेला पंतप्रधानांकडून हवी आहेत,
- जम्मू कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यांबाबत गंभीर आरोप केले आहेत.
- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानींबाबत विचारलेल्या प्रश्नांना अद्यापही उत्तरे देण्यात आलेली नाही.
- माजी मुख्यमंत्री पृथ्वाराजी चव्हाण यांच्या संबोधनाला सुरुवात
- अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे फळबागांचे नुकसान झाले असून अद्याप कोणालाही मदत मिळालेली नाही.
- या आरोपांबाबतचे कोणतेही पुरावे त्यांना मिळालेले नाही. आता कोणीही आपल्याला मैदानात उतरण्यापासून रोखू शकत नाही.
- आपल्यावर 100 कोटींचे आरोप केले, त्यावेळी चौकशीनंतर एक कोटीचे आरोपपत्र दाखल केले.
- आपल्यावर केलेले खोटे आरोप एकीव स्वरुपाचे असल्याचे चौकशीनंतर सिद्ध झाले.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या संबोधनाला सुरुवात
- सभेचे संयोजक सुनाल केदार यांच्या संबोधनाला सुरुवात
- भारतमातेची प्रतिमा आणि संविधानाच्या प्रतीलाही पुष्पहार अर्पण करत अभिवादन
- छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन
- विरोधी पक्षनेते अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आगमन
- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सभास्थळी आगमन
- यावरून त्यांचे हिंदुत्वाशी, विकासाशी घेणेदेणे नाही. त्यांना फक्त सत्ता हवी आहे.
- महाविकास आघाडीने मंदिरांना दिलेल्या निधीला या सरकारने स्थगिती दिली.
- गैरमार्गाने ईडीचे सरकार आल्याने जगभरात महाराष्ट्राची बदनामी झाली.
- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अमदार नितीन देशमुख यांच्या संबोधनाला सुरुवात
- वज्रमूठ उगारून या भ्रष्ट सरकारला चले जाओ म्हणण्याची वेळ आली आहे.
- वज्रमूठ महाराष्ट्राची, सुरक्षा संविधानाची हा निर्धार करूया
- काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांच्या संबोधनाला सुरुवात
- बहुजनांवर अन्याय करण्यात येत आहे. जाणीवपूर्वक दंगली घडवण्यात येत आहेत.
- एनसीआईरटीच्या अभ्यासक्रमातून मुघल आणि गांधीजींचा इतिहास काढून टाकला आहे, देशात सध्या काय सुरू आहे
- विदर्भात जातीयवादाला थारा नाही.
- हा महात्मा गांधीचा देश आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवावे.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या संबोधनाला सुरुवात
































































