Live – धनुष्यबाण शिवसेनेपासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही  – उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद –

 

  • पुन्हा विधानसभेच्या निवडणूका घ्या. जर आम्ही चुकलो असू तर जनता आम्हाला घरी बसवेल.
  • भाजपने घात केला म्हणून महाविकास आघाडीचा जन्म झाला.
  • एकाच प्रश्नच उत्तर जनता मागत आहे….इतके पद देऊनही असे का वागले….
  • जनतेच्या मनात अनेक प्रश्न आहेत.
  • आमच्यावर टीका करणाऱ्यांना मिठ्या मारताना तुम्हााला आनंद मिळत असेल तर तो तुम्हाला लख लाभ
  • माझ्या मुलाला आयुष्यातून उठविण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांचे स्वागत तुम्ही स्वीकारत आहे….
  • पण जो पक्ष आमच्याविरोधात अश्लाघ्य भाषेत विकृत भाषेत बोलत होता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात तर मग तुमचं प्रेम खरं आहे की खोटं आहे.
  • मातोश्रीने सन्मानाने बोलवलं तर भाजपशी चर्चा केली तर आम्ही परत येऊ असं सांगत आहेत. तिकडे जाऊनही तुम्ही जे प्रेम दाखवत आहात.
  • आपला देश हा पहिल्या दोन तीन नंबरचा देश आहे ज्यात लोकशाही आहे. या देशात लोकशाहीचं भविष्य किती राहिलं आहे. लोकशाहीचे चार स्तंभ आपलं कर्तव्य नीट पार पाडतायत का ते जग पाहणार आहे.
  • उद्याची जी केस आहे ती देशात लोकशाहीचं भविष्य किती काळ टिकणार आहे, बाबासाहेबांच्या राज्यघटनेनुसार देश चालणार आहे का हे दाखवणारा तो निकाल असणार आहे.
  • येत्या सुनावणीत जो काही निकाल लागेल तो फक्त शिवसेनेच्या भवितव्याचा नसणार
  • असे जिगरीचे माणसं जिथे असतात तिथे विजय नक्की असतो.
  • माझ्यासोबतचे 15 16 आमदार माझ्यासोबत राहिले त्यांचे मी कौतुक करतो. त्यांना धमक्या दिल्या गेल्या पण ते म्हणाले की आम्ही नाही हटणार.
  • शिवसेनेच्या भवितव्याला कुणीही धोका पोहचवू शकत नाही… समाजात एक भ्रम निर्माण केला जात आहे. सर्व आमदार गेले तरी शिवसेना संपू शकत नाही
  • एक असतो विधीमंडळ पक्ष मी म्हणेन की रस्त्यावरचा पक्ष
  • शिवसेना कुणाची ही काही गोष्ट नाही, चोरून नेऊ शकेल असं कुणी नाही
  • मोठी झालेली माणसं गेली. पण ज्यांनी मोठी केलं. ती साधी माणसं शिवसेने सोबत आहेत.
  • शिवसेनेने नेहमी साध्या साध्या माणसांना मोठे केलं
  • जनता फक्त चिन्ह नुष्यबाण हाती घेतलेल्या व्यक्तीची चिन्ह देखील बघतात.
  • धनुष्यबाण शिवसेनेपासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही
  • मला जो त्रास झाला तो कुणाला त्रास नसेल झाला.
  • माशाच्या डोळ्यातील अश्रू कुणाला दिसत नाही असे शिवसेना प्रमुख म्हणायचे. तसंच मलाही वाईट वाटलंय पण त्याचं माझ्या शिवसैनिकांवर दडपण आलं नाही पाहिजे
  • काल रात्रीपर्यंत दररोज सैनिकांचे लोंढेच्या लोंढे येतायत. सर्वांच्या डोळ्यात अश्रू आहेत. भावना दाटून आल्या आहेत.