लॉकडाऊनचा परिणाम, वयाच्या सातव्या वर्षी येतेय मुलींना मासिक पाळी?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना व्हायरसमुळे लागू झालेल्या लॉकडाऊनचा थेट परिणाम अल्पवयीन मुलींच्या आरोग्यावर झाल्याचे समोर आले आहे. या लॉकडाऊनमध्ये अरबट चरबट खाल्ल्याने, सतत घरात राहिल्याने, मोबाईलच्या अतिवापराने काही अल्पवयीन मुलींच्या शरीरात बदल झाले असून या मुली वेळे आधीच वयात आल्याचे समोर आले आहे.

वैज्ञानिक भाषेत या आजाराला प्रिकोशिअस असे म्हटले जाते. मात्र पूर्वी अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच या आजाराच्या केसेस होत्या. मात्र लॉकडाऊनमध्ये यात लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत एक वृत्त दिले आहे.

साधारणत: मुलींना वयाच्या अकराव्या किंवा बाराव्या वर्षी मासिक पाळी येते.. मात्र दिल्लीत राहणारी वर्षाची सानवी ही अवघ्या सातव्या वर्षीय वयात आली. सानवीला मासिक पाळी आली नाही. मात्र तिचे स्तन वाढू लागले, गुप्तांगावर केस येऊ लागले. ते पाहून तिच्या आईला धक्काच बसला. त्यांनी तत्काळ सानवीच्या डॉक्टरांना याबाबत कळवले. सानवीच्या काही चाचण्या व एमआरआय करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी जे सांगितले ते त्यांच्यासाठी देखील नवे होते.

या आजाराला प्रिकोशिअस प्युबर्टी असे म्हटले जाते. यात मुलगा असो वा मुलगी हे वेळेआधीच वयात येतात. सुदैवाने सानवीच्या आईने तिला वेळीच डॉक्टरांकडे नेल्याने डॉक्टरांनी तिला औषध देत तिची मासिक पाळी सध्यासाठी रोखून ठेवली आहे. मात्र जर हे वेळेत लक्षात आले नसते तर सानवीला लहान वयात या सर्व गोष्टींना सामोरे जावे लागले असते.

”लॉकडाऊनमध्ये मुलं अनेक महिने घरात कोंडून होती. त्यामुळे सतत घरात राहून सतत अरबट चरबट खाल्ल. तब्येतीला अपायकारक असे पदार्थ या काळात खाल्ले गेले आहेत. त्यामुळे मुलांमध्ये हार्मोनल बदल झाले असून. त्यातूनच मुलांना प्रिकोशिअस प्युबर्टी येऊ शकते’, असे दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलच्या डॉक्टर पेडिएट्रिक डॉक्टर वैशाखी रस्तुगी यांनी सांगितले आहे.

डॉक्टर वैशाखी यांच्याकडे जून 2020 ते फेब्रुवारी 2021 पर्यंत अशा प्रकारच्या 67 केस आलेल्या आहेत. साधारणता: वर्षभरात त्यांच्याकडे 25 प्रकरणं येतात मात्र यंदा त्यात वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. साधारणत: जगभरात पाचशे मुलींमागे एका मुलगी व दोन हजार मुलांमागे एक मुलगा वेळेआधी वयात येतात.