लॉकडाऊनमुळे हवाप्रदूषण घटले, ओझोनच्या प्रमाणात 17 टक्के वाढ! एल्सेव्हियरचे सर्वेक्षण

वायू प्रदूषण हा देशातील सर्कात मोठा चिंतेचा विषय आहे. वायू प्रदूषणामुळे आरोग्याला खूप मोठा धोका उत्पन्न होतो व अकाली मृत्यूच्या घटनाही घडतात.

लॉकडाऊनच्या काळात वायूप्रदूषण मोठय़ा प्रमाणात घटले असून ओझोनच्या प्रमाणात 17 टक्के वाढ झाल्याची माहिती एल्सेव्हियरच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. हवेतील तरंगते कण हे प्रदूषणाला सर्कात जास्त कारणीभूत असतात. प्रामुख्याने वाहने, निवासी वस्त्या, ऊर्जेचे उत्सर्जन, औद्योगिक उत्सर्जन आणि धूळ यांच्यातून हे तरंगते कण निर्माण होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगातील सुमारे 91 टक्के लोक अशा भागात राहतात, जेथे हवेची गुणवत्ता इष्ट पातळीपेक्षा कमी दर्जाची असते. मार्चपासून कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे घातक घटकांच्या उत्सर्जनाची पातळी लक्षणीय प्रमाणात कमी झाली. साहजिकच हवेचा दर्जा व एकूणच लोकांच्या श्वसनाचे आरोग्य सुधारले. परिणामी त्यांची कोरोनाच्या संसर्गाची शक्यता कमी झाली, असे अहवालात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या