
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीचे ‘राफेल’ उडाले असून 11 एप्रिल ते 19 मे या काळात 7 टप्प्यांत मतदान होणार आहे. लोकसभेच्या सर्व 543 मतदारसंघांचे निकाल 23 मे रोजी लागणार आहेत. महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांत 11, 18, 23 आणि 29 एप्रिल या चार टप्प्यांत मतदान होईल.
Wishing all political parties and candidates the very best for the 2019 Lok Sabha elections.
We may belong to different parties but our aim must be the same- the development of India and empowerment of every Indian!
— Narendra Modi (@narendramodi) March 10, 2019
आइए लोकतंत्र के महापर्व को सफल बनाएं pic.twitter.com/tZ5mbCRUgV
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) March 10, 2019
The biggest democracy has just declared its biggest festival dates! A festival where we choose our voice, our government.
As we, political parties, seek your blessings and votes, we also will put forth the work we’ve done, and the work we are about to do.— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 10, 2019
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी भरगच्च पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच आचारसंहिता देशभरात तत्काळ लागू करण्यात आली आहे. आगामी दोन महिने निवडणूक रणसंग्रामामुळे देशातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. दरम्यान, लोकसभेबरोबरच आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकाही होणार आहेत.
( Video) Election Commission निवडणूक आयोगाची संपूर्ण पत्रकार परिषद
23 मे रोजी निवडणूक निकालानंतर 17 व्या लोकसभेचे चित्र स्पष्ट होईल. सुमारे 90 कोटी मतदार जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीसाठी मतदानाचा हक्क बजावतील. तब्बल 10 लाख केंद्रांवर ईव्हीएमद्वारे मतदान होईल.
१७ व्या लोकसभेसाठी निवडणूक आयोगाची निवडणुकीची घोषणा.
आजपासून आदर्श आचारसंहिता लागू.
महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार.
सर्व मतदारांनी निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष भाग घेऊन मतदान करण्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांचे आवाहन #LokSabhaElections2019 pic.twitter.com/dF8uMm7Fr6— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 10, 2019
सर्व ईव्हीएमला ‘व्हीव्हीपॅट’ मशीन बसविण्यात येणार आहे. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांच्या गाडीला ‘जीपीएस’ कंट्रोल असेल. मतदारांसाठी 1950 हा टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे. 24 तास ही सेवा उपलब्ध असेल, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले.
- 90 कोटी मतदार
- 1950 मतदारांसाठी हेल्पलाइन क्रमांक
- 10 लाख मतदान केंद्रे
- 17 व्या लोकसभेसाठी निवडणूक आचारसंहिता लागू
- ‘नोटा’चे बटण ‘ईव्हीएम’वर असणार.
- उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर त्याबाबत पूर्ण माहिती देणे बंधनकारक.
- सर्व मतदारसंघांत ‘ईव्हीएम’द्वारे मतदान.
- ‘व्हीव्हीपॅट’मशीन बसवणार.
- ‘ईव्हीएम’वर उमेदवाराचा फोटोही असणार.
- 543 जागा
महाराष्ट्रात चार टप्प्यांत मतदान
11 एप्रिल-7 जागा
वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर.
18 एप्रिल-10 जागा
बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, धाराशीव, लातूर, सोलापूर.
23 एप्रिल-14 जागा
जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, रायगड, पुणे, बारामती, नगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले.
29 एप्रिल -17 जागा
नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, मावळ, शिरूर, शिर्डी.
नवमतदारांची संख्या घटली
2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे 90 कोटी मतदारांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये 46.5 कोटी पुरुष, 43.2 कोटी महिला मतदार आहेत. तसेच 33109 मतदारांनी तिसऱ्या प्रवर्गात नोंद केली. 16.6 लाख मतदार हे नोकरदार असून ते पोस्टल मतदान करतील.
2014 च्या निवडणुकीत एकूण मतदारांची संख्या 81.5 कोटी होती. त्यात वय वर्षे 18 ते 19 वयाचे 2.3 कोटी नवमतदार होते. 2019 च्या निवडणुकीत नवमतदारांची संख्या घटली आहे. 1.6 कोटी नवमतदार असून पहिल्यांदा मतदान करणारे हे तरुण-तरुणी कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणे महत्त्वपूर्ण असेल.
सोशल मीडियासाठी नियमावली
- उमेदवाराने अर्ज भरताना आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटची माहिती देणे बंधनकारक.
- राजकीय जाहिरातींसाठी प्री-सर्टिफिकेशन असणे बंधनकारक. गुगल, फेसबुक, ट्विटर, यू टय़ूबवरील जाहिराती तपासणार.
- राजकीय जाहिरातींच्या तक्रारी सोडविण्यासाठी आयोगाकडून स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक.
- या जाहिरातींचा खर्च हा उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करणार.
- विंग कमांडर अभिनंदन वर्धमान आणि लष्करी जवानांच्या फोटोंचा वापर राजकीय जाहिरातींसाठी करू नये.
- जाहिराती, मजकुरांसंदर्भात नागरिकांना काही तक्रारी असतील तर निवडणूक आयोगाच्या C-vigil app वर तक्रार करावी.




























































