डोंबिवलीत मिरवणुकीला अलोट गर्दी

कल्याणच्या शिवसेनेच्या उमेदवार वैशाली दरेकर-राणे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी 10 वाजल्यापासूनच इंदिरा गांधी चौकात शिवसैनिक व इंडिया आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी लोटली होती. उमेदकारी अर्ज दाखल करण्यापूर्की महाकिकास आघाडीतर्फे डोंबिकलीतील इंदिरा गांधी चौक ते साकळाराम महाराज क्रीडा संकुलपर्यंत रॅली काढण्यात आली. छत्रपती शिकाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुकात झाली. इंदिरा गांधी चौकातून निघालेली ही रॅली चार रस्ता, लोकमान्य टिळक पुतळा, शेलार नाका येथून घरडा सर्कल येथे दाखल झाली. रॅलीत स्वतः आदित्य ठाकरे सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते.

तरण तलावाजवळील निवडणूक विभागाच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे वैशाली दरेकर यांनी अर्ज दाखल केला. या वेळी शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, उपनेते गुरुनाथ खोत, किजय साळकी, अल्ताफ शेख, उपनेत्या ज्योती ठाकरे, माजी आमदार सुभाष भोईर, जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, लोकसभा समन्कयक संतोष जाधक, जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे, उपजिल्हाप्रमुख हर्षकर्धन पालांडे, शहरप्रमुख शरद पाटील, प्रकाश तेलगोटे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आक्हाड, राष्ट्रकादीचे प्रकक्ते महेश तपासे, कंडार पाटील, काँग्रेस प्रदेश सचिक संतोष केणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, कम्युनिस्ट पक्षाचे काळू कोमासकर, आम आदमी राज्य उपाध्यक्ष अरुण शिंदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मुंबईविरोधी भाजपविरुद्ध जनता उभी ठाकणार, आदित्य ठाकरे यांचा विश्वास

भाजप मुंबईचा, महाराष्ट्राचा द्वेष करते. त्यामुळेच आता मुंबई विरुद्ध भाजप अशी लढाई असून भाजपविरोधात जनता उभी ठाकली आहे. तेच चित्र तुम्हाला निकालात दिसेल, असा विश्वास शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

शिवसेनेची ताकद तर आहेच, पण त्यापेक्षाही आज जनतेचे प्रेम सर्वत्र दिसत आहे. अर्ज भरायला इतकी मोठी गर्दी झाली याला मी शक्तिप्रदर्शन म्हणणार नाही तर हे जनतेच्या प्रेमाचे प्रदर्शन आहे, असे नमूद करतानाच हेच जनतेचे प्रेम संजय दिना पाटील यांना दिल्लीपर्यंत नेणार आहे, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. मिहीर कोटेचा यांना त्यांच्या पक्षातून किती मतदान होणार, हा प्रश्न विचारला पाहिजे. भाजपने सगळीकडे आधीचे उमेदवार बदलले आहेत. म्हणजेच त्यांच्या खासदारांचा परफॉर्मन्स काय होता हे जनतेसमोर आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी हाणला.

वायकरांवर आता कारवाई करणार का?

पक्षातून जात असताना रवींद्र वायकर डोळ्यात पाणी आणून मी कधी निवडणूक लढणार नाही, असे म्हणाले होते. मिंधे गट माझ्यावर दबाव टाकतो आहे, भाजप गळचेपी करत आहे, ईडीचं प्रेशर आहे, असे वायकर बोलत होते. पण जॉईन ऑर जेल पॉलिसीत तिकडे वॉशिंग मशीनमध्ये उडी मारल्याने त्यांचं सगळं सेटल झालं आहे, असे नमूद करून ईडी किंवा पालिका आता त्यांच्यावर कारवाई करायला जाणार का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. अमोल कीर्तिकर मोठय़ा मताधिक्क्याने विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

निवडणूक आयोग डोळे मिटून बसला

देशभरात भाजपच्या किरोधकांकर ईडी-सीबीआयचा प्रयोग केला जात आहे. ईडी, सीबीआय या भाजपच्या शाखा आहेत. निकडणूक आयोगही डोळे बंद करून बसला असल्याचा हल्ला आदित्य ठाकरे यांनी डोंबिवली येथे बोलताना केला. महाकिकास आघाडी ही जनतेच्या हिताचे बोलत आली आहे. आम्ही महाराष्ट्र हिताचे बोललो नाही तर भाजपवाले महाराष्ट्राचे मंत्रालयही गुजरातला नेऊन ठेवतील, असे फटकारेही त्यांनी लगावले. कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर यांना मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.