
डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने निर्मित, राहुल आवटे, जयंत जठार दिग्दर्शित ‘पंचक’ चित्रपट आता सिनेमागृहांत प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी माधुरी आणि त्यांची टीम चित्रपटगृहांना भेट देत आहेत. त्यांनी मुंबई, पुणे, ठाणे येथील काही चित्रपटगृहांना भेट दिली. अनेक ठिकाणी ‘माधुरी, माधुरी’ असा आवाज देत त्यांचे जंगी स्वागत झाले. काहींनी माधुरी दीक्षित यांना नाव घेण्याची विनंतीही केली. माधुरीनेही चाहत्यांची ही इच्छा पूर्ण केली. या वेळी चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांसोबत संवाद साधला. प्रेक्षकांनी चित्रपटात आवडलेल्या काही दृश्यांवर चर्चाही केली. ‘पंचक’ला भरभरून प्रेम दिल्याबद्दल माधुरीने या वेळी प्रेक्षकांचे आभार मानले.





























































